Pages

Thursday 6 October, 2011

स्टॉकहोम इस्रायलचे शास्त्रज्ञ डॅनिएल शेक्टमान यांना 2011 वर्षाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. शेक्टमान यांनी १९८२ साली केलेल्या संशोधनामुळे रसायनशास्त्रज्ञांचा घनरूप पदार्थामधील द्रव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. याची पोचपावती म्हणून त्यांना हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. अशक्य समजल्या जाणा-या मोझेकसारख्या रासायनिक संरचना असलेल्या क्वासिक्रिस्टल च्या शोधाबद्दल शेक्टमान यांना नोबेल पारितोषिक देण्यात येत असल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमीनं जाहीर केलंय. स्फटिकांमधील अणू , सममिती म्हणजे एकसमान व पुनरावृत्ती होणा-या रचनेच्या स्वरुपात बंदिस्त असतात असे वाटत होते. मात्र , हे अणू पुनरावृत्ती न होऊ शकणा-या रचनेमध्ये बंदिस्त करता येऊ शकतात, हे शेक्टमान यांनी सिद्ध करून दाखवले. सुरुवातीला त्यांच्या या संशोधनाला प्रचंड विरोध झाला. ते ज्या संशोधक चमूमध्ये काम करत होते, त्यातून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली होती. पण शेक्टमान मागे हटले नाहीत.