Pages

Showing posts with label Science. Show all posts
Showing posts with label Science. Show all posts

Wednesday, 9 May 2012

RAKT

रक्ताच्या अभ्यासाला हिमातोलोजी असे म्हणतात.                                                                                  

मानवाच्या शरीरात एकूण 5 ते 6 लिटर रक्त असते .                                                                                        

रक्त गोठण्याच्या क्रियेत पुढील घटक मदत करत असतात 
 कॅल्शियम  
विटामिन के
विटामिन सी 
 रक्त बिम्बिका

रक्ताचे विशिष्ट गुरुत्व 1.035 ते 1.075 एवढे असते .

रक्तात हेमोग्लोबिन चे प्रमाण साधारणत: 15.9 ग्र्येम /100मिली इतके असते .

रक्ताचे सामू 7.2 ते 7.4 असतो . 

एकदा रक्तदान केल्यावर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे 3 महिन्याचा कालावधी ग्राह्य मानला जातो   .

Wednesday, 10 August 2011

सौर ऊर्जेवरआधारित नासाचे ' जुनो ' हे अंतराळयान ' गुरु ' ग्रहाच्या सफरीसाठी अवकाशात!

सौर ऊर्जेवरआधारित नासाचे ' जुनो ' हे
अंतराळयान पाच वर्षांच्या ' गुरु ' ग्रहाच्या सफरीसाठी अवकाशात झेपावले आहे .
सौरमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आले आहे .
फ्लोरिडा येथील हवाई दलाच्या तळावरून चार रॉकेट्सच्या सहय्याने
अंतराळाकडे झेपावले . यानंतर तासाभरात '
जुनो ' ने अंतराळातील आपला प्रवास सुरू केला .
हे यान १ . १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून
बनविण्यात आले आहे . आतापर्यंत गुरुवर
पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानांपेक्षा हे
यान वेगळे असून ते गुरुच्या सर्वाधिक जवळ जाणार आहे. या मोहिमेदरम्यान
गेल्या ३०० वर्षांपासून वैज्ञानिकांना संभ्रमात पाडलेल्या गुरुवरील गडद लाल ठिपक्याचे रहस्य उलगडले जाणार आहे.