Pages

Sunday 12 September, 2010

Welcome 2 my blog!

Hi friends,
heartly welcome on my blog! This is the blog which will give u information on the topics related 2 MPSC.
Friends this blog will help u in ur study of MPSC Exams.

18 comments:

  1. hello,
    First Many Many Thanks 2 U For MPSC katta Project. I also Member Of MPSC katta Since From 19 Nov 2010.
    plz Think on it.. u create 1 Online Website MPSC Question Practice Test like MS-CIT Online Demo...
    It Is batter 2 student goes net Cafe and will practice online Witin time slove question .
    Thanks & Regards
    Shrikrishna Takale
    9960425175

    ReplyDelete
    Replies
    1. i want to knw that website plz

      Delete
  2. उदाहरणे सोडविण्याचा सराव महत्त्वपूर्ण
    सामान्य अध्ययन भाग 2 मधील "सांख्यिकी' हा घटक 40 गुणांसाठी असून नेमकेपणाने आणि नियोजनबद्ध सराव केल्यास या घटकामध्ये स्कोअरिंग करणे शक्‍य होते. "सांख्यिकी' घटकाच्या तयारीमध्ये उदाहरणे सोडविण्याचा सराव हा महत्त्वपूर्ण भाग असून अभ्यासक्रमामधील समाविष्ट उपघटकांवरील विविध प्रकारची उदाहरणे सोडवून अचूकता आणि नेमकेपणा वाढविणे शक्‍य होते.

    साधारणतः सांख्यिकी घटकावर 10 गुणांचे प्रश्‍न विचारले जातात. वर्णनात्मक स्वरूपात दिलेल्या सामग्रीचे वर्गीकरण आणि तक्ते या स्वरूपात सादरीकरण, मध्य, मध्यक, बहुलक यावर आधारित उदाहरणांचा समावेश सांख्यिकी घटकामध्ये होतो. या उपघटकांच्या व्याख्या आणि योग्य नमुने आणि सूत्रे यांचा वापर करून उदाहरणे सोडविण्याचा सराव या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाची बाब ठरते.

    तसेच, वेन आकृत्या, स्तंभालेख, रेषालेख, हिस्टोग्राम, वारंवारिता बहुभूज यांसारख्या आकृत्यांमध्ये दिलेल्या सामग्रीचे रूपांतर करण्यासंदर्भातील प्रश्‍नदेखील या घटकामध्ये विचारले जातात. दिलेल्या माहिती सामग्रीवरून प्रश्‍नामध्ये दिलेल्या सूचनेवरून आकृत्यामध्ये माहिती रूपांतर करण्याच्या विविध प्रकारांचा नेमकेपणाने सराव त्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. आकृत्यांमधील जलद रूपांतर करण्याचे तंत्र अवगत करण्याच्या दृष्टीने वेळेचे नियोजन आवश्‍यक ठरते.
    आकृत्यांवरील प्रश्‍नांमध्ये आकृतीतील माहितीवर आधारित प्रश्‍न विचारले जातात. आकृतीतील माहिती समजावून घेऊन माहितीचे सुयोग्य विश्‍लेषण करून त्यावरील प्रश्‍न अचूकपणे सोडविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्‍नांचा सराव उपयुक्त ठरतो.

    दिलेल्या माहितीवरून समस्या सोडविण्यासाठीचे "अल्गोरिदम' आणि "फ्लो-चार्ट' तयार करण्यासंदर्भातील प्रश्‍नांचा समावेशदेखील "सांख्यिकी' घटकामध्ये होतो. अशा प्रकारच्या उदाहरणांचा नेमकेपणाने सराव त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील प्रश्‍नपत्रिकांच्या अवलोकनाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या उदाहरणांच्या प्रकारांची माहिती मिळविणे शक्‍य होते. उदाहरणे सोडविण्याचा सराव, व्याख्या आणि सूत्रे यांची तयारी आणि वेळेचे योग्य नियोजन "सांख्यिकी' घटकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.

    ReplyDelete
  3. अद्ययावत माहितीचे संकलन महत्त्वाचे
    एमपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 1 मधील 40 गुणांचा आणखी एक घटक म्हणजे मानवी हक्क व दुर्बल घटकांचे कल्याण होय. यात मानवी हक्कांची संकल्पना, तिचा विकास, भारतीय संदर्भात मानवी हक्क, मानवी हक्क आयोग, सर्वोच्च न्यायालय, शिक्षण व मानवी हक्क या घटकांचा अभ्यास समाविष्ट आहे. त्याचबरोबर महिला, बालके, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास, कामगार, अपंग आणि वृद्ध या घटकांच्या कल्याणासंबंधी विविध शासकीय योजना व कार्यक्रम यांचाही समावेश आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, ग्राहक संरक्षण जागतिकीकरणाचा विविध घटकांवरील परिणाम, शिक्षण व नीतिमूल्ये हे अभ्यास घटकही समाविष्ट केले आहेत. विशेषतः दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या शासकीय योजना व त्यासंबंधी कार्य करणाऱ्या विविध यंत्रणांवर बरेच प्रश्‍न विचारले जातात. त्यादष्टीने महाराष्ट्र वार्षिकी, लोकराज्य, योजना आणि दरवर्षी प्रसिद्ध होणारा भारत तसेच महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल या संदर्भांचा अवलंब करणे महत्त्वपूर्ण ठरते. वर्तमानपत्रात आलेली विविध धोरणे, योजना व कार्यक्रमविषयक माहिती वेळोवेळी नमूद करून ठेवावी.

    चालू वर्षी कोणत्या नव्या लोककल्याणकारी योजना स्वीकारण्यात आल्या किंवा एखादी प्रचलित योजना कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असेल तर त्याची लागलीच माहिती संकलित करावी. कारण त्या योजनेविषयी परीक्षेत प्रश्‍न येण्याची दाट शक्‍यता असते. विविध धोरणे, कार्यक्रम व योजना यांची तयारी करताना त्या योजनेचा प्रारंभ, योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, आर्थिक तरतूद, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, त्या योजनेचे मूल्यमापन आणि त्यात आवश्‍यक सुधारणा अशा विविध अंगांनी तयारी करावी. या घटकाच्या संदर्भात अद्ययावत व अधिकृत माहितीचे संकलन करणे महत्त्वपूर्ण ठरते. अशी माहिती जमा केल्यास तिचा प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात सराव करणे क्रमप्राप्त ठरते.

    या घटकांची प्रभावीपणे तयारी करून यात अधिकाधिक गुण प्राप्त करता येतील आणि सामान्य अध्ययनातील आपले चांगल्या गुणांचे लक्ष्य गाठता येईल.

    ReplyDelete
  4. सर्व घटकांचा प्रश्‍नारूप अभ्यास निर्णायक
    सामान्य अध्ययन पेपर - एक 'मधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे "भारतीय राज्यव्यवस्था' (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात). या घटकाची 40 गुणांसाठी तयारी करताना सर्व अभ्यासक्रम पाहून मुख्य परीक्षेच्या मागील चारही प्रश्‍नपत्रिका पाहाव्यात. अभ्यासक्रम व मागील प्रश्‍नांचे विश्‍लेषण करून अभ्यासाची व्याप्ती व धोरण ठरवावे. प्रश्‍नांचे विश्‍लेषण केल्यास असे लक्षात येते की एका बाजूला 2, 5, 10 व अपवादात्मक परिस्थितीत 20 गुणांसाठी प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे विविध प्रकरणांचा अभ्यास करताना विविध गुणांसाठीच्या प्रश्‍नांची उत्तरे (निर्धारित शब्दमर्यादेत) तयार करावीत. तसेच निर्धारित शब्दसंख्येतच उत्तरे लिहिणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या बाजूला वैशिष्ट्ये सांगा, स्पष्ट करा, परीक्षण करा, मूल्यमापन करा, टीकात्मक करा, मान्य आहे का?, मत सांगा अशा निरनिराळ्या प्रकारचे प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे प्रश्‍नाच्या स्वरूपानुसारच उत्तरे लिहिण्याची सवय विकसित करणे अत्यावश्‍यक आहे.

    भारतीय प्रजासत्ताकास 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यासंबंधी प्रश्‍न विचारले जाऊ शकतात किंवा बिहारमधील निवडणुका, अयोध्येवरील निकाल, नक्षलवादी चळवळ या मुद्‌द्‌यांवरही प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे राज्यव्यवस्थेवरील काही प्रश्‍न हे आव्हानात्मक स्वरूपाचे असतात. उदा. "भारतीय संघराज्यातील केंद्र - राज्य संबंधात कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत? हा प्रश्‍न. असे प्रश्‍न कोणत्याही रूढ संदर्भपुस्तकात आढळत नाहीत. त्यासाठी विचार, चिंतन व मनन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. तसेच वर्तमानपत्रे व नियतकालिकातील विश्‍लेषणात्मक लेखांचे वाचन गरजेचे ठरते.

    राज्यव्यवस्थेत महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेविषयीही काही अभ्यासघटक आहेत, त्यांचाही अभ्यास करणे अत्यावश्‍यक आहे. सर्व घटकांचा प्रश्‍नारूप केलेला अभ्यास निर्णायक ठरतो. प्रश्‍नारूप लिहिण्याची क्षमता विकसित झाल्यानंतर केवळ मुद्‌द्‌याच्या स्वरूपात उत्तराच्या नमुन्याच्या चौकटी तयार कराव्यात. त्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्‍य होईल. या अभ्यास पद्धतीच्या जोरावरच राज्यव्यवस्थेच्या 40 गुणांपैकी अधिकाधिक गुण प्राप्त करून एकंदर सामान्य अध्ययनाचा स्कोअर वाढवता येईल.

    ReplyDelete
  5. कृषी घटकाची तयारी विस्ताराने करा
    नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास हा सामान्य अध्ययन पेपर-2 मधील 40 गुणांसाठीचा घटक असून, त्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास, फलोद्यान विकास, वने, अन्न आणि पोषण हे उपघटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासाशी निगडित हे सर्व महत्त्वपूर्ण घटक असून, "कृषी' या घटकाची तयारी अधिक विस्ताराने करण्याची आवश्‍यकता आहे. साधारणतः या घटकावर 20, 10, 5 आणि 2 गुणांचे प्रश्‍न विचारले जातात. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, मत्स्यविकास, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, फलोद्यान या क्षेत्रांचे महत्त्व आणि या क्षेत्रांच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण शासकीय धोरणे आणि विकासाशी निगडित सद्यःस्थितीतील समस्या या बाबींची तयारी अधिक नेमकेपणाने करण्याची आवश्‍यकता आहे.

    सर्व क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासकीय धोरणे आणि उपाययोजनांची तयारी करण्यासाठी आर्थिक पाहणी अहवाल, योजना मासिक कार्यक्रमांची माहितीपत्रिका यांची माहिती उपयुक्त ठरते. हरितक्रांती, अन्नधान्य स्वयंपूर्णता, अन्नसुरक्षा, मानवी आरोग्य आणि पोषण, विविध पोषक तत्त्वे या संदर्भातील संकल्पना, कार्यक्रम आणि आकडेवारीची तयारी करावी, कृषी विपणन, ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतपुरवठा, कृषीची आदाने, कृषी उत्पादकता संदर्भातील विविध समस्या, शासनाची धोरणे आणि उपाययोजना आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या समस्या यांची माहिती मिळवावी.

    श्‍वेत क्रांती, महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायातील सहकारी संस्था, महाराष्ट्रातील फलोद्यान विकासाचा कार्यक्रम, महाराष्ट्रातील महत्त्वाची फळपिके, कोरडवाहू शेतीतील फळपिकांचे महत्त्व, महाराष्ट्रातील मत्स्यविकास यांची नेमकेपणाने माहिती हाही या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था, महत्त्व, सुधारणा, सद्यःस्थितीतल उपाययोजना, पोषणविषयक विविध उपक्रम आणि शासकीय उपाययोजना यांची नेमकेपणाने तयारी करावी.

    ReplyDelete
  6. भारताचे परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंध
    सामान्य अध्ययन पेपर 2 मधील 40 गुणांसाठी एमपीएससीने आपल्या मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट केलेला घटक म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंध होय. या घटकात भारताचे परराष्ट्र धोरण, भारताचे आण्विक धोरण, भारताच्या बाह्य, अंतर्गत सुरक्षिततेच्या बाबी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी व संस्था या प्रकरणांचा समावेश होतो. इतर घटकांप्रमाणे या घटकाच्या अभ्यासाचे धोरण ठरवण्यासाठी अभ्यासक्रम व प्रश्‍नपत्रिकांचे सूक्ष्म विश्‍लेषण आणि त्या आधारे संभाव्य प्रश्‍नांची सूची तयार करणे या बाबी प्राथमिक तयारी म्हणून कराव्यात. घटकाची तयारी करताना अलीकडील 4-5 वर्षे आणि विशेषतः मागील वर्षी आंतरराष्ट्रीय संबंधात घडलेल्या घटना व प्रक्रियांची अद्ययावत माहिती प्राप्त करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारताच्या इतर राष्ट्रांशी असलेल्या संबंधाची तयारी करताना संबंधाचा थोडक्‍यात इतिहास, दोहोंतील वादाचे मुद्दे, सहकार्याची क्षेत्रे व प्रयत्न या संबंधात अलीकडे घडून आलेल्या घडामोडी, संबंधाची सद्यःस्थिती आणि दोहोंतील संबंधाचे भवितव्य या सर्वांचा विचार करून त्यासंबंधी मुद्देसूद तयारी करावी. तीच बाब भारताच्या अणुधोरणाबाबत आहे.

    भारताच्या सुरक्षेचा विचार करता जमातीय हिंसा, नक्षलवाद, काळा पैसा, दहशतवाद, नशिल्या पदार्थाचा चोरटा व्यापार यांसारखी अंतर्गत व बाह्य स्वरूपाच्या आव्हानाची माहिती संकलित करून त्यावर मात करण्यासाठी शासनाने स्वीकारलेल्या धोरणाचीही तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. त्याचप्रमाणे शीतयुद्धोत्तर काळात आखाती युद्ध, नाटोचा विस्तार, जागतिक दहशतवादाचा उदय अशा अनेक घटनांचीही तयारी करणे अत्यावश्‍यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघटना आणि प्रादेशिक स्तरावर सार्क, आसियान, युरोपीय संघ यांसारख्या क्षेत्रीय आर्थिक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांची स्थापना, उद्दिष्टे, कार्य व भूमिका, अलीकडील काळात या संघटनांचे कामकाज, त्यांनी स्वीकारलेली कार्यक्रम पत्रिका आणि दरवर्षी अथवा नियमितपणे होणाऱ्या त्यांच्या शिखर परिषदा यांचा अभ्यास गरजेचा ठरतो. हा अभ्यास करताना चालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे महत्त्वपूर्ण ठरते.

    ReplyDelete
  7. भारतीय राज्यघटना व कारभार प्रक्रिया
    भारतीय राज्यघटना या पूर्वीच्या घटकात बदल करून आता त्यास ‘भारतीय राज्यघटना व कारभार प्रक्रिया’ असे शीर्षक दिले असून, महत्त्वाचे म्हणजे त्यात राज्यघटना, पंचायतराज, राज्यव्यवस्था या जुन्या घटकांबरोबरच कारभार प्रक्रिया, सार्वजनिक धोरणे व हक्कविषयक कळीचे मुद्दे हे नवे घटक समाविष्ट केले आहेत. स्वाभाविकच येणाऱ्या परीक्षेत या घटकाची व्याप्ती वाढण्याचीच शक्यता आहे. भारतीय घटना व कारभार प्रक्रिया या घटकात वस्तुत: कोणतीही शैक्षणिक पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष रस असतो. कारण प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने याचा विचार केलेला असतो. म्हणूनच सामान्य अध्ययनातील खात्रीलायक घटक व आपली मार्काची बेरीज वाढवणारा घटक म्हणून यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
    मागील १० वर्षांच्या सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिका पाहता राज्यघटनेवर साधारणत: विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यास या प्रश्नांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते.
    (१) ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास व आंदोलने
    (२) राज्यघटनेतील तरतुदी (मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, संसद व संघराज्य प्रणाली, महत्त्वाची पदे, संस्था व आयोग या विषयक कलमे)
    (३) महत्त्वाच्या घटना दुरुस्ती व घटना दुरुस्ती विधेयके
    (४) उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निवाडे
    (५) महत्त्वाच्या समित्या व आयोगाच्या शिफारशी
    (६) संसदेत अलीकडे मांडलेली नवी विधेयके व केलेले नवे कायदे
    याखेरीज कारभार प्रक्रिया, सार्वजनिक धोरणे व हक्कविषयक कळीचे मुद्दे या नव्या घटकांची तयारी करावी लागणार आहे. या घटकांशी संबंधित संकल्पना, त्यात सहभागी होणाऱ्या संस्था व यंत्रणा, विविध सार्वजनिक धोरणे, त्यातील नवे पुढाकर, हक्कांचे प्रकार, त्यासंबंधी घटनात्मक तरतुदी, दुरुस्ती व न्यायालयाचे निवाडे तयार ठेवावेत.
    राज्यघटनेच्या तयारीच्या बाबतीत नवीन विद्यार्थ्यांना सतत असे वाटत असते की राज्यघटनेत समाविष्ट सर्व कलमांची महिती असणे व ती तोंडपाठ असणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता हा एक भ्रम आहे हे मागील प्रश्नपत्रिका पाहिल्यास लक्षात येते.

    ReplyDelete
  8. एमपीएससीमधील यशाचे रहस्य काय? तर या प्रश्‍नाचे एक उत्तर देता येईल, ते म्हणजे योग्य वैकल्पिक विषयांची निवड. मुख्य परीक्षेतील 50% गुण म्हणजे 1600 पैकी 800 गुण दोन वैकल्पिक विषयांसाठी निर्धारित केले आहेत. म्हणूनच आपल्या दोन वैकल्पिक विषयांची योग्य निवड महत्त्वपूर्ण ठरते. आयोगाने 2007 पासून केलेल्या बदलानंतर मुख्य परीक्षेचा विचार केल्यास आपणास असे दिसून येते की, विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी अथवा वाणिज्य शाखेतील विषयांऐवजी लोकप्रशासन, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि समाजशास्त्र हे विषय यशदायी वैकल्पिक विषय म्हणून पुढे आले आहेत. वैकल्पिक विषयांची निवड करताना 1) पदवी शिक्षणाची पार्श्‍वभूमी, 2) त्या विषयातील आपला रस व कल, 3) विषयासाठी मार्गदर्शनाची उपलब्धता, 4) संदर्भ साहित्याची उपलब्धता आणि 5) सामान्य अध्ययनासाठी होणारा लाभ, हे घटक लक्षात घ्यावे लागतात. 1) पदवी शिक्षणाची पार्श्‍वभूमी ः अर्थात विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा घटक गौण ठरतो. राज्यशास्त्र लोकप्रशासनासारखे सामाजिक शास्त्रातील विषयदेखील योग्य मार्गदर्शनाच्या आधारे तयार करता येतात. त्यामुळे असे विषय निवडताना आपल्या पदवी शिक्षणाची पार्श्‍वभूमी बाजूला ठेवावी लागते. 2) रस व कल ः आपणास ज्या विषयाची आवड असते तो विषय समजण्यास सोपा जातो. त्याचा अभ्यास लवकर होऊ शकतो. जर आवडीचा विषय नसेल तर विषयावर पकड निर्माण होण्यास वेळ लागतो. आवडीच्या विषयामुळे वेळ व श्रम दोहोंची बचत होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडावेत. 3) मार्गदर्शन ः मार्गदर्शकाचे महत्त्व यासाठी की तो आपल्यास योग्य दिशा दाखवून आपल्या वेळेची बचत करत असतो. वैकल्पिक विषयासाठी नेमके काय वाचायचे, त्याचा अभ्यास कसा करायचा, प्रश्‍नांची उत्तरे कशी लिहायची, या प्रश्‍नांच्या संदर्भ
    ात मार्गदर्शक महत्त्वाचा ठरतो. 4) संदर्भ साहित्याची उपलब्धता ः आपण जो विषय निवडला आहे, त्या विषयाचे संदर्भ साहित्य म्हणजेच पुस्तके उपलब्ध आहेत का हे पाहावे. स्रोताविषयी सर्वांत महत्त्वाचे उपलब्ध साहित्य हे दर्जेदार आहे की नाही हे पाहावे. कित्येक वेळा दर्जेदार पुस्तकांची वानवा दिसून येते. वैकल्पिक विषयांच्या अभ्यासक्रमाची शक्‍य तेवढी मूळ पुस्तके व संदर्भ ग्रंथ वापरावेत. 5) सामान्य अध्ययनातील मूल्य ः वैकल्पिक विषयाची निवड करताना आपला विषय सामान्य अध्ययनात काय भूमिका बजावू शकतो हे पाहणेही खूप महत्त्वाचे ठरते. जर वैकल्पिक विषयामुळे सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी लागणारा वेळ वाचू शकत असेल तर तो विचार करणेही योग्य ठरते.
    वैकल्पिक विषय हे तुमच्या यशामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वैकल्पिक विषयांची निवड जर चुकली तर कदाचित प्रयत्न व वर्षही वाया जाऊ शकते. एकदा विषय निवडला की त्यामध्ये शक्‍यतो फेरबदल करू नये. म्हणून विषय निवडतानाच या सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.

    ReplyDelete
  9. उत्तरांच्या सादरीकरणाचा सराव
    राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन-1, सामान्य अध्ययन-2 हे चार पेपर अनिवार्य आहेत. या प्रत्येक पेपरसाठी 200 गुण आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एकूण 1600 गुणांपैकी 800 गुण अनिवार्य विषयांना असून, अनिवार्य विषयांची तयारी हा राज्यसेवा परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा आहे. अनिवार्य विषयांचा आवाका व्यापक असल्याने अनिवार्य विषयांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याबरोबरच उत्तरांच्या सादरीकरणाचा सरावदेखील महत्त्वाचा ठरतो. मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांची तयारी करताना भाषिक कौशल्ये आणि मुद्देसूद मांडणी यावर भर द्यावा. भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी वाचन महत्त्वाचे असते. मराठी आणि इंग्रजी या विषयांतील लेखन घटकांतील विविध नमुन्यांचे अवलोकन करून या नमुन्यांचा सराव लेखन कौशल्ये विकसित होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. इंग्रजीच्या तयारीसाठी इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढविणे उपयुक्त ठरते. सामान्य अध्ययन-1 आणि सामान्य अध्ययन-2 या दोन्हीही पेपरमध्ये प्रत्येकी पाच घटकांचा समावेश होतो आणि या घटकांमध्येही उपघटक आहेत.
    एकूण दहा घटकांचा अभ्यासक्रम व्यापक असल्याने नेमकेपणाने तयारी उपयुक्त ठरते. त्या दृष्टीने संदर्भसाहित्याची निवड महत्त्वाची आहे. सामान्य अध्ययन-1 आणि सामान्य अध्ययन-2 या पेपरची तयारी करताना आधीच्या प्रश्‍नपत्रिकांमधील प्रश्‍नांच्या स्वरूपाचे अवलोकन करणे उपयुक्त ठरते. सामान्य अध्ययनाच्या घटकांची तयारी करताना सर्व घटकांमध्ये समतोल राखणे महत्त्वाचे ठरते

    ReplyDelete
  10. पूर्वपरीक्षेनंतर राज्यसेवा परीक्षेची तयारी लगेच
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षा हा राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. पूर्व परीक्षेमध्ये अर्हता मिळविलेले विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. अर्थातच, राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी पूर्व परीक्षेनंतर लगेच करणे खूपच उपयुक्त ठरते. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप विस्तारित आहे. ही परीक्षा एकूण 1600 गुणांची असून, एकूण 8 पेपरची तयारी करण्यासाठी योग्य अवधीची आवश्‍यकता असते. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच सादरीकरण, लिखाणाची गती, भाषिक कौशल्ये यांमध्ये सुधारणा करण्यासाठीदेखील सरावाची आवश्‍यकता असते.
    राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये "चार' अनिवार्य विषय असून, त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन- 1 आणि सामान्य अध्ययन - 2 या विषयांचा समावेश होतो. हे सर्व विषय प्रत्येकी दोनशे गुणांचे असून, प्रत्येक पेपरसाठीचा कालावधी तीन तासांचा आहे. म्हणजेच चार अनिवार्य विषयांसाठी एकत्रित आठशे गुण आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये दोन वैकल्पिक विषय निवडावे लागतात. प्रत्येक वैकल्पिक विषयांचे दोन पेपर असतात. वैकल्पिक विषयांचे दोन्ही पेपरदेखील प्रत्येकी 200 गुणांचे असतात. प्रत्येक पेपरसाठीचा कालावधी तीन तासांचा असतो. म्हणजेच दोन वैकल्पिक विषयांसाठी एकूण गुण 800 आहेत. वैकल्पिक विषयांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली असून, त्यापैकी दोन वैकल्पिक विषय निवडताना काही वैकल्पिक विषयांच्या जोड्या घेता येणार नाहीत असे आयोगाने नमूद केले आहे. त्या गटातील विषयांची यादीदेखील आयोगाकडून देण्यात आलेली आहे.
    वैकल्पिक विषयांची निवड विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम आणि मागील प्रश्‍नपत्रिका यांचे अवलोकन केल्यास विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरेल. अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषयांची एकत्रित तयारी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी करणे आवश्‍यक असल्याने तयारीसाठी पुरेसा वेळ आणि नेमकेपणाने तयारी करणे उपयुक्त ठरते.

    ReplyDelete
  11. मित्रानो वरील सर्व माहिती हि राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देणारे विध्यार्थी यांना अत्यंत उपुक्त आहे.
    हि माहिती उच्च दर्जा असलेया " लोकसत्ता व सकाळ " या वृत्तपत्रातून संकलित केली आहे

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. hi! I want to take geography sub for rajyaseva final. so can u sujest me which books i have to refer?

    ReplyDelete
  14. पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा २०११ ची जाहिरात अलीकडेच प्रकाशित झाली आहे. १२१२ जागा असल्याने सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तशी तुमची तयारीसुद्धा चालू झाली असेल, ही अपेक्षा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मेहनत घेताना ती स्मार्टपणे घेणं आवश्यक असते. कारण परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा आवाका आणि हातात असलेला वेळ याची सांगड घालायची तर नियोजनाशिवाय पर्याय नाही. अभ्यासाचे नियोजन करताना खालील बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.
    ० अभ्यासक्रम व गुण विभाजन
    ० उपलब्ध असलेला वेळ
    ० संदर्भ पुस्तके
    ० पाठांतर + समजून घेणे + क्लृप्त्या (सूत्रांसाठी)
    ० प्रश्नपत्रिका संच सराव
    वरील पाच पायऱ्या यशस्वीरीत्या पार केल्या तर पूर्वपरीक्षेत तुम्ही हमखास यश मिळवू शकाल. या टप्प्यांचा आपण आता सविस्तर विचार करू.
    अभ्यासक्रम
    PSI पूर्व परीक्षेसाठी सुरुवातीला अभ्यासक्रमावर ओझरती नजर टाकू. त्यात इतिहास, भूगोल, समाजसुधारणूक, नागरिकशास्त्र, पंचायत राज, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, अंकगणित, चालू घडामोडी या सर्वाचा समावेश होतो. सर्व विषयांची संदर्भ पुस्तके, नोट्स जमवून अभ्यासाला सुरुवात करावी. अभ्यास हा पाठांतरावर आधारित न करता परीक्षेचे स्वरूप लक्षात घेत त्यानुसार करावा.
    उपलब्ध असलेला वेळ
    परीक्षा येत्या २६ जून रोजी असल्यामुळे तुमच्याकडे तयारीसाठी सुमारे महिनाभराचा कालावधी आहे. त्यातील सात दिवस तुम्ही सराव, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी राखीव ठेवला तर प्रत्येक विषयाला पाचपेक्षा कमी दिवस उरतात. आता या पाच दिवसांत प्रत्येक विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यात पहिल्या दोन दिवसांत फक्त त्या विषयाचे उपलब्ध असलेली टिपणं, पुस्तके वाचा आणि उर्वरित तीन दिवसांत पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयांचा अभ्यास सविस्तर करा. अशा प्रकारे वेळेचे नियोजन केल्यास अभ्यासक्रम व वेळेची सांगड घालताना मदत होईल.
    संदर्भ पुस्तके
    पुस्तकांच्या दुकानात स्पर्धा परीक्षेसाठी संदर्भ पुस्तकांची रेलचेल असते. ती पाहून अर्धे विद्यार्थी गोंधळून जातात आणि अर्धी लढाई तिथेच गमावतात. पुस्तके ही मार्गदर्शक, गुरूचं काम करतात. कोणत्याही एका मार्गदर्शकावर श्रद्धा ठेवा आणि अभ्यासाला लागा. एकदा का त्या विषयाचा आवाका तुम्हाला कळला की आपोआप तुम्हालाच त्या विषयाचा अभ्यास किती व कसा करायचा या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील.
    पाठांतर+ समजून घेणे+ क्लृप्त्या
    या तीन गोष्टींचा समन्वय म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या यशाचे गमक आहे. जे विषय, जो भाग तुम्हाला समजण्यास अवघड वाटतोय तो समजून घेणं, बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांसाठी काही युक्त्या तयार करणं, सूत्र, कलम, नियम पाठ करणं अन् एवढं केल्यानंतर सर्वाचा सतत सराव करावा. कारण Practice Makes Man perfect
    प्रश्नपत्रिका संच सराव
    मागील कमीतकमी १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव हा परीक्षेसाठी अन् आपल्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवल्याने परीक्षेच्या दिवशी येणारा ताणतणाव आणि त्यामुळे होणाऱ्या छोटय़ामोठय़ा चुका कमी होतील, तसेच वेळेत पेपर सोडवण्याची सवय लागेल.
    वरील पाचही टप्पे तुम्हाला यशाच्या जवळ जाण्यास नक्कीच मदत करतील. नियोजनाचा भाग संपला की, आता सुरुवात करायची त्याच्या अंमलबजावणीची. म्हणजे अर्थातच प्रत्यक्ष अभ्यासाची. अभ्यासक्रम पाहता सर्व विषयासाठी उत्तम संदर्भ पुस्तके सहज उपलब्ध होणे शक्य आहे. चालू घडामोडींवरचे प्रश्न पूर्वपरीक्षेला ५० गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये आयोगाकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील चालू घडामोडी विचारल्या जातात. ज्यातून विद्यार्थ्यांचे सामाजिक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रश्नांचे भान, त्यांचे मत, त्यांची विचारशक्ती पडताळून पाहतात. मित्रांनो, हे ५० गुण तुम्ही सहज मिळवू शकाल. परंतु अनेक विद्यार्थी यातच मागे पडतात अन् बाकी विषयांचा अभ्यास चांगला असून ‘कट ऑफ’ गुणांपर्यंत मजल मारू शकत नाहीत. ‘चालू घडामोडी’ या विषयाचा दररोज फक्त एक तास अभ्यास केला (जेव्हा इतर विषय वाचून कंटाळा आलेला असतो) तरी या विषयात जास्तीतजास्त गुण मिळवण्यासाठी मदत होईल. त्यासाठी दररोज वर्तमानपत्र वाचन, बातम्या पाहणं, ठराविक मासिकं वाचणं उपयुक्त ठरेल.
    परीक्षापद्धती लक्षात घेत जर योग्य पद्धतीने अभ्यास केलात तर नक्कीच यश मिळवू शकाल.
    --

    ReplyDelete
  15. वि विध स्रोतांतून प्रसिद्ध झालेली माहिती, मार्गदर्शक आणि स्वयं यशस्वी विद्यार्थी यांचे मनोगत पाहिल्यास साधारणतः त्यांच्या अभ्यासपद्धतीचा अंदाज येतो. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रारंभी किमान एक वर्ष या परीक्षेची सातत्यपूर्ण तयारी केलेली दिसून येते.

    प्रसंगी नोकरीत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी रजा घेऊन हे नियोजन प्रत्यक्षात आणले. प्रारंभी या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन संपूर्ण अभ्यासक्रम बारकाईने पाहिला. त्यानंतर आयोगाच्या मागील प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण केले आणि त्या-त्या विषयांसाठी संदर्भ साहित्याची सूची प्राप्त करून नियोजित अभ्यास केला. सर्वच यशवंतांनी म्हटल्याप्रमाणे जरी या परीक्षेत तीन भिन्न टप्पे असले तरी त्याचा सुटा-सुटा अभ्यास करणे फारसे उपयुक्त ठरत नाही. कारण काही अभ्यासक्रम हा तिन्ही टप्प्यांत अभ्यासावा लागतो. दुसरे म्हणजे अभ्यासक्रमाबरोबरच काही संदर्भही सारखेच असतात. स्वाभाविकच काही अभ्यासघटक सर्वत्र तयार करावे लागतात.

    त्यामुळे तयारी करताना समग्र दृष्टिकोन ठेवणेच फलदायी ठरते. तथापि एखाद्या घटकावर पूर्वपरीक्षेला कशाप्रकारे प्रश्‍न विचारले जातात, मुख्य परीक्षेत त्यावर कसे प्रश्‍न विचारतात, आणि मुलाखतीला कसे विचारतात, ही बाब लक्षात घ्यावी लागते. एखादा विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्‍नपत्रिका यांचे किती नेमके व सखोल विश्‍लेषण करतो यावरच या परीक्षेसाठी (तिन्ही टप्प्यांचे भिन्नत्व लक्षात घेऊनही) समग्र दृष्टिकोन कसा स्वीकारावा हे लक्षात येऊ शकते.

    दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वैकल्पिक विषयांच्या तयारीबरोबरच (सर्व विद्यार्थी यासाठी भरपूर वेळ देतात) सामान्य अध्ययन आणि निबंधाच्या पेपर्सची व्यवस्थित तयारी करणे निर्णायक ठरते. बरेच विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करताना बहुतांश वेळ वैकल्पिक विषयांसाठी राखीव ठेवतात. परिणामी सामान्य अध्ययनाकडे दुर्लक्ष होते. मात्र, अलीकडील काळात सामान्य अध्ययनाच्या पेपर्सचा व्याप वाढल्याचे दिसून येते. त्यातील प्रश्‍नांचे स्वरूपही वरचेवर आव्हानात्मक बनत आहे. अशा स्थितीत सुरवातीपासूनच सामान्य अध्ययनाची तयारी विस्तृत व नेमकेपणाने करणे अत्यावश्‍यक आहे. तीच बाब निबंधाच्या पेपरची आहे.

    यशवंतांच्या मनोगतातून पुढे आलेली तिसरी बाब म्हणजे नियोजित अभ्यास. यात अभ्यास, त्याची उजळणी आणि सराव चाचण्या या प्रत्येक घटकांचे नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरते. अभ्यासाचे नियोजन करताना सराव चाचण्यांना योग्य वेळ निर्धारित करणे गरजेचे ठरते. सराव चाचण्यांद्वारेच लेखनात नेमकेपणा आणता येतो. यासंदर्भात आणखी एक बाब निदर्शनास येते, ती म्हणजे प्रश्‍नपत्रिकांमध्ये प्रश्‍नांची गुणसंख्या व उत्तराची शब्दमर्यादा या बाबतीत यूपीएससी अनेकदा बदल करत असते. असे बदल प्रत्यक्ष परीक्षेतच लक्षात येतात. गेल्या वर्षी मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांत 60 गुणांचे मोठे प्रश्‍न विचारण्याऐवजी 12, 15, 20, 30 आणि 40 गुणांसाठी प्रश्‍न विचारण्यात आले. भरपूर सराव चाचण्यांमुळे आपले लेखनकौशल्य सुधारते आणि या लेखनकौशल्याच्या जोरावरच अशा बदलांना समर्थपणे सामोरे जाता येते. "मुलाखतीलाही योग्य न्याय द्या', हा त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. अधिकाधिक वाचन, चिंतन, मनन याबरोबरच मॉक इंटरव्ह्यूद्वारा मुलाखतीची तयारी करता येते. त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्या तयारीचे मूल्यमापन व्हावे आणि त्यातून आपल्या चुका सुधाराव्यात यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. थोडक्‍यात अभ्यासातील समग्र दृष्टिकोन, प्रत्येक विषयाची योग्य तयारी, काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाद्वारेच या यशवंतांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. मग आता लक्ष्य आहे पुढील वर्षी स्वयं यशवंत बनण्याचे!

    ReplyDelete
  16. this is very good dicision because threre no other good site to provide mpsc information & knowledge free

    ReplyDelete
  17. latest chalu ghadamodi mahiti denari ekhadi site sangu shakta ka?

    ReplyDelete