![]() |
A blog dedicated to Maharashtra public service commission's (MPSC) exam related topics, news and useful information
Saturday, 5 May 2012
Thursday, 6 October 2011
स्टॉकहोम इस्रायलचे शास्त्रज्ञ डॅनिएल शेक्टमान यांना 2011 वर्षाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. शेक्टमान यांनी १९८२ साली केलेल्या संशोधनामुळे रसायनशास्त्रज्ञांचा घनरूप पदार्थामधील द्रव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. याची पोचपावती म्हणून त्यांना हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. अशक्य समजल्या जाणा-या मोझेकसारख्या रासायनिक संरचना असलेल्या क्वासिक्रिस्टल च्या शोधाबद्दल शेक्टमान यांना नोबेल पारितोषिक देण्यात येत असल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमीनं जाहीर केलंय. स्फटिकांमधील अणू , सममिती म्हणजे एकसमान व पुनरावृत्ती होणा-या रचनेच्या स्वरुपात बंदिस्त असतात असे वाटत होते. मात्र , हे अणू पुनरावृत्ती न होऊ शकणा-या रचनेमध्ये बंदिस्त करता येऊ शकतात, हे शेक्टमान यांनी सिद्ध करून दाखवले. सुरुवातीला त्यांच्या या संशोधनाला प्रचंड विरोध झाला. ते ज्या संशोधक चमूमध्ये काम करत होते, त्यातून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली होती. पण शेक्टमान मागे हटले नाहीत.
Monday, 29 August 2011
बाबुराम भट्टराय यांची नेपाळचे नवे पंतप्रधान
Thursday, 18 August 2011
अमेरिकन पेन पुरस्कार २ भारतीयांना जाहीर
अमेरिकेतील मानाच्या ' पेन ' साहित्य पुरस्कारासाठी यंदा पुलित्झर विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी आणि लेखक - पत्रकार मनू जोसेफ या दोन भारतीयांची निवड झाली आहे .
आले . यंदापासूनच सुरू झालेल्या १० हजार अमेरिकन डॉलर्स रकमेच्या इ . ओ . विल्सन
लिटररी सायन्स रायटिंग अॅवॉर्डसाठी सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ' द एम्परर ऑफ
मेलडीज ' ची निवड झाली तर मनू घोष यांच्या ' सीरियस मेन ' लाही पेन
पुरस्काराचा मान मिळाला.भारतीय नौदलात रशियन पाणबुड्या दाखल होणार!
अणूहल्ल्याची क्षमता असलेल्या या अकुला-टू
पाणबुड्यांची यशस्वी चाचणी पूर्ण होताच
दहा वर्षांच्या लीजवर त्या भारतीय नौदलात दाखल होतील.रशियन नौदलातील
अधिकारी आणि पाणबुड्यांचे निर्माते तज्ज्ञ
यांच्या देखरेखीखाली या पाणबुड्यांची चाचणी सुरू
आहे. या चाचण्या पूर्णझाल्यानंतर सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत
भारतीय नौदलात त्या सामील होतील.
' नेर्फा'ने निर्माण केलेल्या या पाणबुड्यांविषयी भारताकडून तरी काहीही आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत.
व्लॉडिवोस्टोक येथून
येणाऱ्या जहाजावरून या पाणबुड्या ऑगस्ट
महिन्यांच्या अखेरीस भारतीय नौदलाकडे
सुपूर्द केल्या जातील.Wednesday, 10 August 2011
थायलंडच्या पंतप्रधान पदी यिँगलुक शिनावात्रा
पंतप्रधानपदावर निवड झालेल्या ४४ वर्षांच्या यिंगलुक थायलंडच्या पहिल्या महिला असतील .
थायलंडच्या २८ व्या पंतप्रधान म्हणून त्या शपथ घेतील .
त्यांची ' फिआ थाई पार्टी ' आणि सहकारी पक्षांनी कनिष्ठ सभागृहात तीन पंचमांश बहुमत मिळवत सत्ताधारी डेमोक्रॅट्सला खडे चारले .थायलंडच्या २८ व्या पंतप्रधान म्हणून त्या शपथ घेतील .
Subscribe to:
Posts (Atom)





