Pages

Saturday 5 May, 2012


अन्नविषबाधा ज्या जंतूंपासून होते, त्या जंतूंना प्रभावीपणे  प्रतिबंध करणारा एक घटक  लसणामध्ये शास्त्रज्ञांना आढळला असून विशेष म्हणजे  विषबाधेवर वापरल्या जाणाऱ्या दोन प्रसिध्द अ‍ॅण्टिबायोटिक्स औषधांच्या तुलनेत लसणातील हा घटक १०० पटींनी अधिक गुणकारी असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.                 ‘डायलिल सल्फाइड ’ नावाचा हा घटक शरीरातील जंतूंचा प्रभावीपणे प्रतिकार करतो. एरिथ्रोमायसीन आणि सिप्रोफ्लोक्सेसीन  या दोन प्रभावी अ‍ॅण्टिबायोटिक्स औषधांपेक्षा शतपटींनी अधिक गुणकारी  असलेल्या  ‘ डायलिल सल्फाइड ’ या  घटकाचा परिणामही अत्यंत कमी वेळात होतो असे  चांचण्या घेण्यात आल्यानंतर ‘वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांना आढळून  आले.

No comments:

Post a Comment