Pages

Saturday, 5 May 2012

युरोपीय मराठी संमेलनाचे कार्डिफमध्ये उदघाटन

भारताबाहेर राहणा-या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, 6 ते 8 एप्रिल 2012दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे होत आहे. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्षपद निभावत आहेत.

कार्डिफ मधील मराठी मंडळाच्या पुढाकाराने, कार्डिफ येथील पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये नववे युरोपियन मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. युरोपमध्ये राहणा-या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणा-या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होत आहेत.

No comments:

Post a Comment