भारतीय
 योगविद्येचा सर्वदूर प्रसार होण्यासाठी चीनमध्ये पहिले योग विद्यालय सुरू 
झाले आहे. या कॉलेजमध्ये योगविद्या शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शिक्षकांना
 प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. योगविद्या शिकून रोज योगासने 
करणाऱ्यांचे प्रमाण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. योगविद्येचे प्रशिक्षण 
देणाऱ्या एका कॉलेजची गरज चीनमध्ये निर्माण झाल्यामुळे चीनमध्ये योग 
विद्यालय सुरू करण्यात आले. 
 
 योगी योगा इन्स्टिट्यूट ऑफ चायना 
यांच्यावतीने या कॉलेजची उभारणी करण्यात आली असून यिन यान या कॉलेजच्या 
प्रमुख असणार आहेत. त्या 'एल्ले' या फॅशनविषयक नियतकालिकाच्या माजी 
संपादिका आहेत. त्यांनी भारतातील हृषिकेश येथे राहणारे योगशिक्षक मनमोहन 
सिंह भंडारी यांच्याशी विवाह केला. त्यानंतर चीनमध्ये या दांपत्याने 
योगविद्येचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्यानंतरच योगविद्येसाठी 
संस्थात्मक काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योगविद्यालयामध्ये हट
 योगाचे शिक्षण दिले जाणार आहे.  

 
No comments:
Post a Comment