Pages

Thursday, 10 May 2012

जपान १०० टक्के अणुऊर्जामुक्त!

जपानमधील हौक्कैडो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने देशातील शेवटची अणुभट्टी बंद करण्याची प्रक्रिया  केली. त्यामुळे अणुऊर्जा वापरात जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानमध्ये अणुऊर्जेचा अजिबात वापर न करण्याची वेळ १९७०नंतर प्रथमच आली आहे.

गेल्या वर्षी झालेला भूकंप आणि नंतर आलेल्या त्सुनामीमुळे टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या फुकुशिमा दाईइची अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी पडझड झाली. त्यातून किरणोत्सारही झाला. त्यामुळे नागरिकांचा अणुऊर्जेवरील विश्वास कमी झाला आणि देखभालीसाठी बंद केलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास विरोध झाला.

उत्तर जपानमधील तोमरी अणुऊर्जा प्रकल्पातील तिसऱ्या युनिटमधील वीजनिर्मिती ९१२ मेगावॉटवरून कमी करायला शनिवारी सुरुवात केली  . रविवारी सकाळी हे युनिट पूर्णपणे बंद झाले . त्यामुळे एकंदर पन्नास अणुभट्ट्या असलेल्या जपानमधील सर्व अणुभट्ट्या बंद होणार आहेत. जपान अणुऊर्जामुक्त असल्याचा मे १९७० पासूनचा हा पहिलाच दिवस असेल.

No comments:

Post a Comment