Pages

Monday 29 August, 2011

बाबुराम भट्टराय यांची नेपाळचे नवे पंतप्रधान

माओवाद्यांचे व्हाईस चेअरमन बाबुराम
भट्टराय याची आज नेपाळचे नवे पंतप्रधान
म्हणून निवड झाली.

तराईच्या माधेसी अलायन्सने देशातील
राजकीय अशाश्वतता , अस्थिरता नष्ट
होण्याच्या दृष्टीने
माओवाद्यांना पाठिंबा दिल्याने
माओवाद्यांना पुन्हा सत्तेवर येणे शक्य झाले.
भट्टराय यांचे शिक्षण भारतात झाले आहे.

Thursday 18 August, 2011

अमेरिकन पेन पुरस्कार २ भारतीयांना जाहीर


अमेरिकेतील मानाच्या ' पेन ' साहित्य पुरस्कारासाठी यंदा पुलित्झर विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी आणि लेखक - पत्रकार मनू जोसेफ या दोन भारतीयांची निवड झाली आहे .
पेन अमेरिकन सेंटरतर्फे विविध १७ विभागांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात
आले . यंदापासूनच सुरू झालेल्या १० हजार अमेरिकन डॉलर्स रकमेच्या इ . ओ . विल्सन
लिटररी सायन्स रायटिंग अॅवॉर्डसाठी सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ' द एम्परर ऑफ
मेलडीज ' ची निवड झाली तर मनू घोष यांच्या ' सीरियस मेन ' लाही पेन
पुरस्काराचा मान मिळाला.

भारतीय नौदलात रशियन पाणबुड्या दाखल होणार!

भारतीय नौदलात दाखल होणाऱ्या के-१५२ या रशियन पाणबुडीची चाचणी सध्या जपानच्या समुदात घेण्यात येत आहे.
अणूहल्ल्याची क्षमता असलेल्या या अकुला-टू
पाणबुड्यांची यशस्वी चाचणी पूर्ण होताच
दहा वर्षांच्या लीजवर त्या भारतीय नौदलात दाखल होतील.
रशियन नौदलातील
अधिकारी आणि पाणबुड्यांचे निर्माते तज्ज्ञ
यांच्या देखरेखीखाली या पाणबुड्यांची चाचणी सुरू
आहे. या चाचण्या पूर्ण
झाल्यानंतर सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत
भारतीय नौदलात त्या सामील होतील.
' नेर्फा'ने निर्माण केलेल्या या पाणबुड्यांविषयी भारताकडून तरी काहीही आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत.
व्लॉडिवोस्टोक येथून
येणाऱ्या जहाजावरून या पाणबुड्या ऑगस्ट
महिन्यांच्या अखेरीस भारतीय नौदलाकडे
सुपूर्द केल्या जातील.

Wednesday 10 August, 2011

थायलंडच्या पंतप्रधान पदी यिँगलुक शिनावात्रा

यिंगलुक शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधान म्हणून निवड निश्चित झाली आहे .
पंतप्रधानपदावर निवड झालेल्या ४४ वर्षांच्या यिंगलुक थायलंडच्या पहिल्या महिला असतील .
 थायलंडच्या २८ व्या पंतप्रधान म्हणून त्या शपथ घेतील .
त्यांची ' फिआ थाई पार्टी ' आणि सहकारी पक्षांनी कनिष्ठ सभागृहात तीन पंचमांश बहुमत मिळवत सत्ताधारी डेमोक्रॅट्सला खडे चारले .

सौर ऊर्जेवरआधारित नासाचे ' जुनो ' हे अंतराळयान ' गुरु ' ग्रहाच्या सफरीसाठी अवकाशात!

सौर ऊर्जेवरआधारित नासाचे ' जुनो ' हे
अंतराळयान पाच वर्षांच्या ' गुरु ' ग्रहाच्या सफरीसाठी अवकाशात झेपावले आहे .
सौरमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आले आहे .
फ्लोरिडा येथील हवाई दलाच्या तळावरून चार रॉकेट्सच्या सहय्याने
अंतराळाकडे झेपावले . यानंतर तासाभरात '
जुनो ' ने अंतराळातील आपला प्रवास सुरू केला .
हे यान १ . १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून
बनविण्यात आले आहे . आतापर्यंत गुरुवर
पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानांपेक्षा हे
यान वेगळे असून ते गुरुच्या सर्वाधिक जवळ जाणार आहे. या मोहिमेदरम्यान
गेल्या ३०० वर्षांपासून वैज्ञानिकांना संभ्रमात पाडलेल्या गुरुवरील गडद लाल ठिपक्याचे रहस्य उलगडले जाणार आहे.

Wednesday 3 August, 2011

जुनागढ केशर आंब्यास मिळाले जिओग्राफिकल इंडिकेशन!


गुजरातच्या जुनागढ केशर
आंब्याने आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली आहे.
गिरनार पर्वतरांगांच्या पायथ्याशी पिकणाऱ्या या आंब्याला जिओग्राफिकल
इंडिकेशन (GI) मिळाल्याने तो 'गिर केसर' या नावाने ओळखला जाईल.
उत्तरप्रदेशच्या दशहरी आंब्यानंतर जीआय
रजिस्ट्रेशन मिळवलेला आंब्याचा हा दुसरा वाण आहे. याचा फायदा जुनागढमधल्या शेतकऱ्यांना होणार असून यापुढे वलसाड, कच्छ भागात
पिकणारा केशर आंबा हा गिर केशरच्या नावावर खपवला जाणार नाही. असे
आढळल्यास जीआय कायद्यानुसार त्याला एक ते
दोन वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.
जुनागढ आणि आम्रेली जिल्ह्यात हा आंबा पिकवला जातो. खुद्द जुनागढच्या नबाबाने 'केशर' असे नामकरण केलेला हा आंबा आहे.

Tuesday 2 August, 2011

ए. के. ब्राऊन भारताचे नवे एअर चीफ मार्शल

एअर चीफ मार्शल प्रदीप
वसंत नाईक यांच्याकडून
एअर मार्शल नॉर्मन अनिल
कुमार ब्राऊन यांनी भारताच्या हवाई दल
प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आणि ते एअर
चीफ मार्शल झाले. हवाई दल ब्राऊन यांना ‘चार्ली ब्राऊन’ या विशेषनामाने
ओळखते. ते भारतीय हवाई दलाचे २३ वे प्रमुख
आहेत. लढाऊ
विमानाच्या वैमानिकाच्या हाती भारतीय
हवाई दलाची सूत्रे
देण्याची परंपरा याही खेपेस पाळण्यात आली.

यशवंत देव यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहिर


‘ शुक्रतारा मंद वारा ’ , ‘ जीवनात ही घडी अशीच राहू दे ’ , ‘ अखेरचे येतील
माझ्या ’ , यासारख्या सुमधूर गाण्यांनी मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात
कायमचं घर करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव
यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान देणा-
या व्यक्तींना राज्य सरकारतर्फे गेली अनेक
वर्षं लतादीदींच्या जन्मदिनी लता मंगेशकर
पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
यंदा या पुरस्कारासाठी निवड समितीनं यशवंत देव यांच्या नावाची शिफारस
केली होती, त्यावर आज सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं
शिक्कामोर्तब केलं. यापूर्वी हा पुरस्कार सुमन
कल्याणपूर, महेंद्र कपूर, खय्याम, सुलोचना चव्हाण आदि मान्यवरांना प्रदान
करण्यात आला आहे.

केशेगाव साखर कारखान्याची सौरउर्जा क्षेत्रात आघाडी

उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सुमारे १७ कोटी रूपये खर्चून सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे.
क्रिस्टाइल फलकाच्या आधारे सौर ऊर्जा निमिर्ती करणारा हा देशातील
पहिला सहकारी कारखाना ठरला आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण खरेदी करणार असून
या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे १६ लाख युनीट वीज निमिर्ती होणार आहे.

Monday 1 August, 2011

फुले धन्वंतरी - सर्जिकल कापसाचे नवे वाण !

राहुरी येथील महात्मा फुले
कृषी विद्यापीठात या कापसाचे नवे
वाण शोधण्यात आले.
त्याचे नावही ‘फुले
धन्वंतरी’ असे ठेवण्यात आले आहे.
सुती कपडय़ासाठी लागणारा धागा लांब
असावा, त्यात ताकद
असावी याला प्राधान्य असते. पण दवाखान्यात वापरला जाणारा कापूस मुलायम असावा लागतो.
त्याची पाणी शोषून घेण्याची, साठविण्याची व पुन्हा सोडून देण्याची क्षमता अधिक असावी लागते.
असाच मुलायम कापूस शोधण्यात आला.
दवाखान्यांमध्ये कापसाची मोठी गरज असते.
माणसांच्या जखमा धुण्यासाठी हा कापूस
वापरला जातो. खानदेशात वाय १ व जेएलओ
७९४ या गावठी वाणाचा कापूस त्यासाठी वापरला जातो. देशात
आता प्रथमच वैद्यकीय वापरासाठी निवड
पद्धतीने कापूस संशोधित करण्यात आला. नेहमीच्या कापसाला जखमेतील
पाणी शोषून घेण्यासाठी दहा सेकंद लागतात. नव्या संशोधित ‘फुले धन्वंतरी’ जातीचा कापूस अवघ्या १.९ सेकंदात जखमेतील पाणी शोषून घेतो.
शोषलेले पाणी पुन्हा दोन सेकंदांत सोडतो. इतर
कापसाला त्यासाठी दहा सेकंद लागतात.
या कापसाची पाणी साठवणक्षमताही अधिक
आहे. एक ग्रॅम कापूस २६ ग्रॅम पाणी शोषून घेतो. अन्य कापूस मात्र २४ ग्रॅम पाणी शोषून घेतो.
‘फुले धन्वंतरी’चे उत्पादनही प्रचलित
देशी वाणापेक्षा २२ टक्के अधिक म्हणजे हेक्टरी १ हजार ४२० आहे.
शिवाय हा कापूस जीवाणूजन्य व बुरशीजन्य करपा व दहिया या रसशोषक रोगाला प्रतिकारक आहे.
‘सर्जिकल कापूस’ हा प्रामुख्याने
पाणी शोषून घेणारा लागतो.