Pages

Monday 1 August, 2011

फुले धन्वंतरी - सर्जिकल कापसाचे नवे वाण !

राहुरी येथील महात्मा फुले
कृषी विद्यापीठात या कापसाचे नवे
वाण शोधण्यात आले.
त्याचे नावही ‘फुले
धन्वंतरी’ असे ठेवण्यात आले आहे.
सुती कपडय़ासाठी लागणारा धागा लांब
असावा, त्यात ताकद
असावी याला प्राधान्य असते. पण दवाखान्यात वापरला जाणारा कापूस मुलायम असावा लागतो.
त्याची पाणी शोषून घेण्याची, साठविण्याची व पुन्हा सोडून देण्याची क्षमता अधिक असावी लागते.
असाच मुलायम कापूस शोधण्यात आला.
दवाखान्यांमध्ये कापसाची मोठी गरज असते.
माणसांच्या जखमा धुण्यासाठी हा कापूस
वापरला जातो. खानदेशात वाय १ व जेएलओ
७९४ या गावठी वाणाचा कापूस त्यासाठी वापरला जातो. देशात
आता प्रथमच वैद्यकीय वापरासाठी निवड
पद्धतीने कापूस संशोधित करण्यात आला. नेहमीच्या कापसाला जखमेतील
पाणी शोषून घेण्यासाठी दहा सेकंद लागतात. नव्या संशोधित ‘फुले धन्वंतरी’ जातीचा कापूस अवघ्या १.९ सेकंदात जखमेतील पाणी शोषून घेतो.
शोषलेले पाणी पुन्हा दोन सेकंदांत सोडतो. इतर
कापसाला त्यासाठी दहा सेकंद लागतात.
या कापसाची पाणी साठवणक्षमताही अधिक
आहे. एक ग्रॅम कापूस २६ ग्रॅम पाणी शोषून घेतो. अन्य कापूस मात्र २४ ग्रॅम पाणी शोषून घेतो.
‘फुले धन्वंतरी’चे उत्पादनही प्रचलित
देशी वाणापेक्षा २२ टक्के अधिक म्हणजे हेक्टरी १ हजार ४२० आहे.
शिवाय हा कापूस जीवाणूजन्य व बुरशीजन्य करपा व दहिया या रसशोषक रोगाला प्रतिकारक आहे.
‘सर्जिकल कापूस’ हा प्रामुख्याने
पाणी शोषून घेणारा लागतो.

No comments:

Post a Comment