Pages

Tuesday, 2 August 2011

यशवंत देव यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहिर


‘ शुक्रतारा मंद वारा ’ , ‘ जीवनात ही घडी अशीच राहू दे ’ , ‘ अखेरचे येतील
माझ्या ’ , यासारख्या सुमधूर गाण्यांनी मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात
कायमचं घर करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव
यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान देणा-
या व्यक्तींना राज्य सरकारतर्फे गेली अनेक
वर्षं लतादीदींच्या जन्मदिनी लता मंगेशकर
पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
यंदा या पुरस्कारासाठी निवड समितीनं यशवंत देव यांच्या नावाची शिफारस
केली होती, त्यावर आज सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं
शिक्कामोर्तब केलं. यापूर्वी हा पुरस्कार सुमन
कल्याणपूर, महेंद्र कपूर, खय्याम, सुलोचना चव्हाण आदि मान्यवरांना प्रदान
करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment