MPSCkatta
A blog dedicated to Maharashtra public service commission's (MPSC) exam related topics, news and useful information
Thursday, 14 June 2012
Thursday, 10 May 2012
जपान १०० टक्के अणुऊर्जामुक्त!
जपानमधील
हौक्कैडो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने देशातील शेवटची अणुभट्टी बंद करण्याची
प्रक्रिया केली. त्यामुळे अणुऊर्जा वापरात जगात तिसऱ्या
क्रमांकावर असलेल्या जपानमध्ये अणुऊर्जेचा अजिबात वापर न करण्याची वेळ
१९७०नंतर प्रथमच आली आहे.
गेल्या वर्षी झालेला भूकंप आणि नंतर आलेल्या त्सुनामीमुळे टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या फुकुशिमा दाईइची अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी पडझड झाली. त्यातून किरणोत्सारही झाला. त्यामुळे नागरिकांचा अणुऊर्जेवरील विश्वास कमी झाला आणि देखभालीसाठी बंद केलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास विरोध झाला.
गेल्या वर्षी झालेला भूकंप आणि नंतर आलेल्या त्सुनामीमुळे टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या फुकुशिमा दाईइची अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी पडझड झाली. त्यातून किरणोत्सारही झाला. त्यामुळे नागरिकांचा अणुऊर्जेवरील विश्वास कमी झाला आणि देखभालीसाठी बंद केलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास विरोध झाला.
उत्तर जपानमधील तोमरी
अणुऊर्जा प्रकल्पातील तिसऱ्या युनिटमधील वीजनिर्मिती ९१२ मेगावॉटवरून कमी
करायला शनिवारी सुरुवात केली .
रविवारी सकाळी हे युनिट पूर्णपणे बंद झाले . त्यामुळे एकंदर पन्नास
अणुभट्ट्या असलेल्या जपानमधील सर्व अणुभट्ट्या बंद होणार आहेत. जपान
अणुऊर्जामुक्त असल्याचा मे १९७० पासूनचा हा पहिलाच दिवस असेल.
चीनमध्ये पहिले योगविद्यालय सुरू
भारतीय
योगविद्येचा सर्वदूर प्रसार होण्यासाठी चीनमध्ये पहिले योग विद्यालय सुरू
झाले आहे. या कॉलेजमध्ये योगविद्या शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शिक्षकांना
प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. योगविद्या शिकून रोज योगासने
करणाऱ्यांचे प्रमाण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. योगविद्येचे प्रशिक्षण
देणाऱ्या एका कॉलेजची गरज चीनमध्ये निर्माण झाल्यामुळे चीनमध्ये योग
विद्यालय सुरू करण्यात आले.
योगी योगा इन्स्टिट्यूट ऑफ चायना
यांच्यावतीने या कॉलेजची उभारणी करण्यात आली असून यिन यान या कॉलेजच्या
प्रमुख असणार आहेत. त्या 'एल्ले' या फॅशनविषयक नियतकालिकाच्या माजी
संपादिका आहेत. त्यांनी भारतातील हृषिकेश येथे राहणारे योगशिक्षक मनमोहन
सिंह भंडारी यांच्याशी विवाह केला. त्यानंतर चीनमध्ये या दांपत्याने
योगविद्येचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्यानंतरच योगविद्येसाठी
संस्थात्मक काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योगविद्यालयामध्ये हट
योगाचे शिक्षण दिले जाणार आहे.
प. बंगाल बनले अमेरिकेचे सहयोगी राज्य
अमेरिकेने गुंतवणुकीसाठी पश्चिम बंगालला सहयोगी राज्य म्हणून मान्यता दिली
असल्याचे प्रतिपादन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. भारताच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री
हिलरी क्लिंटन यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची येथील ‘रायटर्स’
इमारतीत भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता दीदींनी सहयोगी
राज्य म्हणून पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेने तयारी दर्शविली
असल्याचे सांगितले.
Wednesday, 9 May 2012
थाळीफेकपटू कृष्णा पूनियाने जिँकले सुवर्णपदक!
भारताची आघाडीची थाळीफेकपटू कृष्णा
पूनियाने हंगामातील आपल्या सर्वोत्तम
कामगिरीची नोंद करताना अमेरिकेतील पोर्टलँडमध्ये झालेल्या वार्षिक अॅथलेटिक
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले .
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पूनियाने सरावाचा एक भाग म्हणून अमेरिकेतल्या या स्पर्धेत ५८ . ८८ मीटर थाळीफेक करून सुवर्णपदक पटकाविले .
पूनियाने हंगामातील आपल्या सर्वोत्तम
कामगिरीची नोंद करताना अमेरिकेतील पोर्टलँडमध्ये झालेल्या वार्षिक अॅथलेटिक
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले .
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पूनियाने सरावाचा एक भाग म्हणून अमेरिकेतल्या या स्पर्धेत ५८ . ८८ मीटर थाळीफेक करून सुवर्णपदक पटकाविले .
RAKT
रक्ताच्या अभ्यासाला हिमातोलोजी असे म्हणतात.
मानवाच्या शरीरात एकूण 5 ते 6 लिटर रक्त असते .
रक्त गोठण्याच्या क्रियेत पुढील घटक मदत करत असतात
कॅल्शियम
विटामिन के
विटामिन सी
रक्त बिम्बिका
रक्ताचे विशिष्ट गुरुत्व 1.035 ते 1.075 एवढे असते .
रक्तात हेमोग्लोबिन चे प्रमाण साधारणत: 15.9 ग्र्येम /100मिली इतके असते .
रक्ताचे सामू 7.2 ते 7.4 असतो .
एकदा रक्तदान केल्यावर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे 3 महिन्याचा कालावधी ग्राह्य मानला जातो .
Saturday, 5 May 2012
युरोपीय मराठी संमेलनाचे कार्डिफमध्ये उदघाटन

Subscribe to:
Posts (Atom)