Pages

Friday 29 July, 2011

शब्बीर अली ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी

भारताचे माजी फुटबॉल कर्णधार शब्बीर अली यांना भारतातील क्रिडा क्षेत्रातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे . हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच फुटबॉलपटू आहेत.
५५ वर्षीय अली मूळचे हैदराबादचे आहेत.
भारताकडून ते शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय
सामने खेळले आहेत . यात त्यांच्या नावावर ३५
हून अधिक गोल आहेत . खेळाडू म्हणून लौकिक
मिळविल्यानंतर त्यांनी अनेक क्लबचे प्रशिक्षक
म्हणून काम पाहिले . भारतीय फुटबॉलमधील
या योगदानाबद्दल अली यांना हा पुरस्कार
जाहीर झाला आहे.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार २००२ पासून दिला जात आहे . पाच लाख रुपये रोख , स्मृतीचिन्ह
असे या पुरस्काराचे स्वरुप आहे .

Thursday 28 July, 2011

निलिमा मिश्रा आणि हरिश हांडे यांना रेमन मँगेसेसे पुरस्कार जाहिर


रॅमन मॅगसेसे पुरस्कार
फाउंडेशनच्या अध्यक्षा कार्मेन्सिटा ऍबिला यांनी या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा केली. दोन भारतीयांसह सहा जणांना आशियातील सर्वांत
प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील नीलिमा मिश्रा आणि हरीश हांडे या भारतीयांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नीलिमा मिश्रा यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात ग्रामविकासाचेनवे मॉडेल विकसित केल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मिश्रा यांनी 200 खेड्यांत 1800 बचतगटांची स्थापना करून 50 लाख अमेरिकी डॉलर्सचे कर्ज वितरित केले. बंगळुरूच्या हरीश हांडे यांना गरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हांडे यांनी "सेस्को' ही कंपनी स्थापन करून
गरिबांना अतिशय कमी खर्चात व परवडणाऱ्या दरांत सौरउर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले.
त्यांच्यामुळे ग्रामीण भागांतील खेड्यातील अनेक गरीब कुटुंबांना रोजगाराची संधी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध झाली. आयआयटी (खरगपूर) मध्ये शिकलेल्या हांडे यांना यापूर्वी सन 2005 मध्ये
"ग्रीन ऑस्कर' जाहीर झाला आहे.

Wednesday 27 July, 2011

लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार डाँ. कोटा नारायणन यांना जाहीर

हलक्या विमानांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
यशस्वीपणे राबवून
देशाची संरक्षणसज्जता बळकट करणारे
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
कोटा हरिनारायण यांना लोकमान्य टिळक
स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात
येणारा यंदाचा ‘लोकमान्य टिळक
सन्मान पारितोषिक’ जाहीर झाला आहे.
एक लाख रुपये, सुवर्णपदक,
स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे
पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोकमान्य टिळकांच्या ९१ व्या पुण्यतिथीदिनी
१ ऑगस्ट रोजी या पारितोषिकाचे वितरण केले जाणार आहे.

' टाईमच्या ' जगातील कर्तृत्ववान पत्नींच्या यादीत झाशीची राणी लक्ष्मीबाईंना स्थान!

मेरी झाँसी नही दूँगी...
अशी गर्जना करत
इंग्रजांशी लढाईच्या मैदानात दोन
हात करणारी झांशीची राणी लक्ष्मीबाई
यांचा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या
'टाइम ' मॅगझिनने अनोखा गौरव
केला आहे.
आपल्या पतीच्या कर्तृत्वामागे
खंबीरपणे उभ्या राहणा-या ' टॉप १० '
पत्नींची यादी मॅगझिनने तयार
केली असून, त्यामध्ये
राणी लक्ष्मीबाईना मानाचे स्थान देण्यात आले आहे. टाइम मॅगझिनने जगातील टॉप १० पत्नींची यादी तयार केली आहे.
या यादीत राणी लक्ष्मीबाई
यांना आठवे स्थान मिळाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक
ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा,
स्पेनची राणी इझाबेल
आणि इजिप्तची बहुचर्चित
राणी क्लिओपात्रा यांचाही यादीत
समावेश आहे.
टाइम मॅगझिनने राणी लक्ष्मीबाई
यांचा गौरव करता म्हटले आहे की, १९
व्या शतका एका सुखीसंपन्न कुटुंबात
आलेली लक्ष्मीबाई
झांशीची राणी बनली.
लक्ष्मीबाईंनी आपल्या बालवयातच
युद्धकलेचे धडे गिरवले होते.
१८५३ मध्ये वारस नसल्याचे कारण पुढे करत
ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचे
झांशीचे साम्राज्य हडप केले.
या घटनेनंतर चार वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात
रक्तरंजित उठाव सुरू झाला.
राणी लक्ष्मीबाई यांनी या लढाईत उडी घेतली आणि अनेक लढायांमध्ये
बलाढ्य ईस्ट इंडिया कंपनीला पाणी पाजले.
इंग्रजांशी लढत असतानाच
घोड्याच्या पाठीवरच त्यांना वीरमरण
आले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२ वर्षांचे होते, असे टाइम मॅगझिनने
आवर्जुन नमूद केले आहे.
टाइम मॅगझिनमधील हा गौरवपूर्ण लेख
माजी विदेश राज्यमंत्री शशी थरूर
यांचे पुत्र ईशान थरूर
यांनी लिहिला आहे.

टॉप १० पत्नींच्या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या पत्नी इलेनोर
रूझवेल्ट पहिल्या क्रमांकावर,
स्पेनची राणी दुस-या स्थानी तर जून
कार्टर कॅश यांना तिसरा क्रमांक देण्यात आला आहे.
इजिप्तची बहुचर्चित
महाराणी क्लिओपात्रा चौथ्या क्रमांकावर,
अलास्काच्या माजी गर्व्हनर साराह पालिन पाचव्या क्रमांकावर, इलेन
डी गेनेरेस
आणि पोर्सियो डी रोसी सहाव्या क्रमांकावर,
मिशेल ओबामा सातव्या क्रमांकावर,
बिल गेट्सची पत्नी मिलिंडा गेटस
नवव्या क्रमांकावर तर वादग्रस्त
गोल्फ खेळाडू टायगर वूड्स
यांची पत्नी इलिन नोरडेग्रेन
दहाव्या क्रमांकावर आहेत..

Tuesday 26 July, 2011

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात नागरी अणुऊर्जा सहकार्य करार

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दक्षिण कोरिया आणि मंगोलिया या दोन देशांच्या दौऱ्‍यावर असून भारत व दक्षिण कोरिया यांच्यात दि. २५ जुलै २०११ रोजी
नागरी अणुऊर्जा सहकार्य करार करण्यात आला असून यामुळे भारतातील
अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधणीमध्ये
सहभागी होण्याचा द. कोरियाचा मार्ग
मोकळा झाला आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि द.कोरियाचे ली म्युँग बंक यांच्यातील
चर्चेनंतर हा करार करण्यात आला.
२००८ मध्ये अणू पुरवठादार गटाने
दिलेल्या संमतीनंतर द.
कोरियाला भारताशी हा करार करता आला.
या गटामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया,
कॅनडा, मंगोलिया, कझाकस्तान,
अर्जेटिना व नामिबिया यांचा समावेश
आहे.
दक्षिण कोरिया सध्या २०
अणुऊर्जा प्रकल्प चालवित असून
त्याद्वारे त्यांच्या विजेच्या ३५
टक्के गरजा पूर्ण
करण्यासाठी ऊर्जा निर्मिती केली जात
आहे.

यामुळे द. कोरिया हा भारतातील अणुऊर्जा विकासकामातील नववा सहकारी देश बनला आहे.

Monday 25 July, 2011

पाकिस्तानला मिळाली पहिली महिला परराष्ट्रमंत्रीपाकिस्तानला मिळाली पहिली महिला परराष्ट्रमंत्री

दहशतवाद्यांच्या विळख्यात
सापडलेल्या पाकिस्तानला पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री मिळणार
आहेत.हा मान मिळाला आहे,
हिना रब्बानी खार यांना.
आंतरराष्ट्रीय
राजकारणाच्या दृष्टीने संवेदनशील
अशा या पदाची जबाबदारी सांभाळणा-
या खार या सर्वात तरूण मंत्री ठरणार
आहेत.साडेतीन
वर्षांपूर्वी त्या सत्ताधारी पाकिस्तान
पीपल्स पार्टीच्या सदस्य बनल्या.
त्या आधी, त्या पाकिस्तान मुस्लीम
लीग क्यू या अमीरउमरावांचा पक्ष
म्हणून ओळखल्या जाणा-या पक्षात
होत्या.

Sunday 24 July, 2011

द्रोणावली हरिका भारताची 2री महिला ग्रँडमास्टर

आंध्रप्रदेशची खेळाडू

द्रोणावली हरिका हिने चीनमधील

हांगझुओ येथील
महिलांच्या ग्रँडमास्टर स्पर्धेत
साडेपाच गुण मिळवीत
खुल्या गटाच्या ग्रँडमास्टर
किताबास गवसणी घातली. हा मान
मिळविणारी ती भारताची दुसरी महिला खेळाडू
आहे. यापूर्वी कोनेरु हंपीने हा मान
मिळविला आहे.
हरिकाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय
मास्टर व महिला ग्रँडमास्टर हे
दोन्ही किताब मिळविले आहेत.

Saturday 23 July, 2011

माळढोक अभयारण्याचे वनक्षेत्र 86% ने कमी

माळढोक पक्ष्यासाठीच्या सोलापूर व
नगर जिल्हय़ांमध्ये
पसरलेल्या अभयारण्यातून ८६ टक्के
क्षेत्र वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय
आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
त्यामुळे आतापर्यंत ८,४९६ चौरस
किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे
अभयारण्य आता केवळ १ हजार २२२ चौरस
किलोमीटरचे उरणार आहे.या आदेशामुळे सोलापूर
जिल्हय़ातील मोहोळ, माढा,
करमाळा आणि सोलापूर या चार
तालुक्यांचा, तर अहमदनगर जिल्हय़ातील
नेवासा, श्रीगोंदा आणि कर्जत अशा तीन
तालुक्यांमध्ये आता गेल्या २५-३०
वर्षांपासून रखडलेल्या अनेक
विकासकामांना चालना मिळणार आहे.
या अभयारण्याचे क्षेत्र निर्धारित
करण्यासाठी भारतीय वन्यजीव
संस्थेचे माजी संचालक डॉ. विश्वास
सावरकर
यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करण्यात
आली होती. या समितीने हे क्षेत्र
कमी करण्याची शिफारस केली होती.
हा अहवाल केंद्रीय वन्यजीव मंडळ,
तसेच अभयारण्य क्षेत्रातील
विकासकामांबाबत अंतिम निर्णय
घेणाऱ्या ‘सेंट्रल एम्पॉवरमेंट
कमिटी’नेही उचलून धरला होता.
हा अहवाल ग्राहय़ धरून सर्वोच्च
न्यायालयाचे
न्यायमूर्ती राधाकृष्णन आणि न्या.
सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने
हा निर्णय दिला.

source: Loksatta