Pages

Thursday 28 July, 2011

निलिमा मिश्रा आणि हरिश हांडे यांना रेमन मँगेसेसे पुरस्कार जाहिर


रॅमन मॅगसेसे पुरस्कार
फाउंडेशनच्या अध्यक्षा कार्मेन्सिटा ऍबिला यांनी या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा केली. दोन भारतीयांसह सहा जणांना आशियातील सर्वांत
प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील नीलिमा मिश्रा आणि हरीश हांडे या भारतीयांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नीलिमा मिश्रा यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात ग्रामविकासाचेनवे मॉडेल विकसित केल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मिश्रा यांनी 200 खेड्यांत 1800 बचतगटांची स्थापना करून 50 लाख अमेरिकी डॉलर्सचे कर्ज वितरित केले. बंगळुरूच्या हरीश हांडे यांना गरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हांडे यांनी "सेस्को' ही कंपनी स्थापन करून
गरिबांना अतिशय कमी खर्चात व परवडणाऱ्या दरांत सौरउर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले.
त्यांच्यामुळे ग्रामीण भागांतील खेड्यातील अनेक गरीब कुटुंबांना रोजगाराची संधी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध झाली. आयआयटी (खरगपूर) मध्ये शिकलेल्या हांडे यांना यापूर्वी सन 2005 मध्ये
"ग्रीन ऑस्कर' जाहीर झाला आहे.

No comments:

Post a Comment